पोस्ट्स

2014 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विडंबन-- पडून आहे सार्त्र अजुनी

पडून आहे सार्त्र अजुनी भावड्या निजलास का रे? एवढ्यातच त्या कम्यूवर तू असा थकलास का रे? अजुनही रचल्या न थप्पी रँडतैच्या पुस्तकांच्या अजुन ’भू’ खचली कुठे रे? हाय! तू खचलास का रे? सांग, ह्या बाख्तीनदाच्या भाविकाला काय सांगू? नच कळे आम्हास ते जे आणि तू रुसलास का रे? बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा फ़्रांत्स काफ़्का, ’रातपारीला बनूनी कीट वळवळलास का रे?’ उगवती डोक्यात माझ्या ’जागतिक’च्या पायवाटा तू बिचार्‍या वाचकांना एवढा  छळलास का रे? -- स्वामी संकेतानंद, १४ नोव्हेंबर,२०१४, नवी दिल्ली

कंपूची लक्षणे

समास पहिला: कंपूलक्षण ॐ नमोजी आंजानरा | लक्ष-लक्ष तारस्वरा | कृपादृष्टी जालवीरा । अवलोकावें ||१|| तुज नमूं गमभन | श्रीबराहा भक्तगण | गुगल इमे तो अन| तुझी रूपे ||२|| वंदून गुगलचरण | करून विकीस्मरण | लाभार्थ कंपूलक्षण | बोलिजेल ||३|| येक कंपू येक ट्रोजनकंपू | उभय लक्षणीं झोडपू | श्रोतीं सादर थोपू | केला पाहिजे ||४|| ट्रोजनकंपूचे लक्षण | पुढिले समासीं निरूपण | सावध होऊनि विचक्षण | परिसोत पुढें ||५|| आतां प्रस्तुत विचार | लक्षणें सांगतां अपार | परि कांहींयेक तत्पर | होऊन ऐका ||६|| जे जालवीर जन | जयांस नाहीं सभाज्ञान | जे केवळ विद्वान | त्यांचीं लक्षणें ||७|| आपुली भुमिका खरी| दाखवोनि विचारी |परकी ती झिडकारी | तो येक कंपू ||८|| देऊन सर्व स्रोत | गुगलून विकी फ़क्त |म्हणवे प्रज्ञावंत| तो येक कंपू||९|| परायडीशी डूख धरी | खवतून उद्धार करी | कमेंट देई विखारी | तो येक कंपू ||१०|| कंपूवीराशी पंगा | घेता करी दंगा | उधळी नाना रंगा | तो येक कंपू ||११|| एकमेकां करे स्तुती |हापिसे भोगी विपत्ति | सांगे कंपूची कीर्ती | तो येक कंपू ||१२|| गंभीर चर्चेवरी | धाग्याचा काश्मीर करी | चालवे टवाळखोरी | तो येक कंप

ग़ज़ल:- अच्छे दिनों के सारे तमाशाई है

क्या खूब चर्चे हैं! क्या पज़ीराई* है! दीवानगी है क्या! क्या मसीहाई है! आसार है के 'आँधी' चलेगी फिर से इन हवाओं से अपनी शनासाई* है इतिहास की पुस्तक में पढ़ेंगे बच्चे, 'सब बाप-दादाओं की मुनाफ़ाई है|' चौपाल पर पत्ते कूटते बैठे हैं अच्छे दिनों के सारे तमाशाई है सच बोल देता हूँ भरी महफ़िल में अपनी यही आदत जान पर आई है -- संकेत, नई दिल्ली, १२ अक्टुबर, २०१४ *पज़ीराई = आवभवत, स्वागत, reception *शनासाई = परिचय, acquaintance ------------------------------------------------------

विडंबन - अशी कबुतरे येती

अशी कबुतरे येती; आणिक घाण ठेवुनी जाती दोन घरांची पुण्यकमाई दहा घरांच्या खाती कपोत आला, पहिला वहिला खिड़कीमागे उभा राहिला तया मागे, येई साजणी गूटर्गूच्या साथी... दुरून येती थवे देखिले मी ग्याल्रीचे दार लोटिले धड़क मारती तरी निरंतर गंधित झाल्या भिंती पंख दोन ते हळु फ़डफ़डले खोलीभर मायेने फिरले हॉलकिचनाच्या भिंतीमधुनि लागेना मज हाती 'पुण्यवान' तो येता गाठी शिव्या पाच मोहरल्या ओठी त्या तुटल्या दातांची गाथा क्रूर कबुतरे गाती -- स्वामी संकेतानंद, १५ ऑक्टोबर, २०१३, नवी दिल्ली

टॉरेंटगाथा

ह्या प्रकाराला ’पोस्टमॉडर्नोत्तर काव्य’ म्हणतात म्हणे. म्हटलं आपणही पाडून बघावी एक पोएम. तर काल रात्री पाडलेली ही रेसिपी चाटुनि आता बघणे.  डार्केस्ट क्लाउडी राती लैपटॉप मांडी असतो लेटेस्ट कोणती मूव्ही मी लगेच आयमडिबतो* टॉरेंट साइटी जाता मी हज़ार नावे बघतो वेचून क्लीन टॉरेंटा सीडणारि* तेची धरतो डाऊनलोडुनी घेतो बँडविड्थ सारी युझुनी रात्रीच पाहुनी मूव्ही गूगलून घेतो अजुनी पिंगूनि मित्र तो बोले ’पाहिलास मूव्ही अमका?’ देऊन आणखी लिंका आणवेल मोठा झटका ’येईल तो नवा सीझन्‌*’ ’एपिसोड आला बघ रे’ यूट्यूब वर चाले गाणी बँडविड्थ सारी विसरे डाऊनलोडण्याची ही सूटणार नाही व्यसने टॉरेंट-कुंपणी ’स्वामी’ थांबवाल आता चरणे? -- स्वामी संकेतानंद, नवी दिल्ली, १३-०९-२०१४ ------------------------------------------------------------------------------------------ आयमडिबणे = imdb.com वर सिनेमाचे रेटिंग/रिव्ह्यू/प्लॉट समरी बघणे सीडणारि = चांगला seed count असणारी टॉरेंट सीझन = इंग्रजी मालिकांचे पर्व.

पितृपक्ष स्पेशल विडंबन- आम्ही कोण

पितृपक्ष स्पेशल विडंबन सादर करत आहे. आस्वाद घेणे. आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू कावळे- देवाने दिधले असे पिंड तयें आम्हांस शीवावया विश्वी या पितराबले विचरतो चोहीकडे लीलया त्रैलोकांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया वळे सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके; काकस्पर्शच आमुचा शकतसे पिंडांप्रती द्यावया- मोक्षातिशया, अशी वसतसे जादू बिलांमाजि या; पापे वाढविता तुम्ही, बदलितो ते भाग्य आम्ही फुके! स्वर्गामाजि वसाहती वसविल्या कोणी नरांच्या बरे? नर्काला मनुलोक साम्य झटती आणावया कोण ते? ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे; ते आम्हीच पितर, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते! आम्हांला वगळा- गतप्रभ झणी होतील मोक्षांगणे आम्हांला वगळा- थकाल पितरांची फेडिता ती ऋणे! -- स्वामी संकेतानंद, नवी दिल्ली, ११/०९/२०१४

सफ़र

उसकी ख़ानाबदोशी वो हिज़्र की रातें सूरज की तपीश बेदरख़्त वीरानें उफ़क़ तक फ़ैले रेत के टीलें.. आहिस्ता आहिस्ता दीन-ओ-इमाँ की रटीं बातें जाती रहीं आँखों में रची-बसी चकाचौंध टिमटिम चाँदनी में फ़ना होती रहीं दिमाग़ी गलियारों से जज़्बातों का एक-एक पुलिन्दा राह में गिरता रहा.. वहदत-उल-वजूद की बातें मिटती रहीं बुतपरस्ती की चाहतें बुझती रहीं और फिर सारी हिकारत उसके जेहन से जाती रही.. क्या वो पशेमाँ था? जी नहीं क्या वो हैराँ था? शायद.... क्या पता? ... शायद.... - नई दिल्ली, ०४-०९-२०१४

एक ऐतिहासिक विजय

एप्रिलमध्ये लिहीलेला हा लेख आता इथे प्रकाशित करतोय. बातमी एव्हाना अगदीच शिळी झाली आहे,  पण त्याला इलाज नाही.  :D  ---संकेत  --------------------------------------------------------------------         २७ मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारतासह आग्नेय आशियाला पोलियो मुक्त जाहीर केले व यासोबतच भारताने दरवर्षी हजारो मुलांना पंगू करणार्‍या एका भयावह रोगावर सुमारे २० वर्षे चाललेल्या लढ्यात एक ऐतिहासिक विजय मिळवला. जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया गटातली इतर राष्ट्रे पोलियो मुक्त झालेली असताना भारतामुळे आग्नेय आशिया गटाला अद्याप प्रमाणपत्र जाहीर झाले नव्हते. भारत पोलियो मुक्त करणे हे सर्वात मोठे आव्हान मानले जात होते.             भारताने पोलियो लसीकरण मोहीम हाती घेण्यापूर्वी दरवर्षी हजारो मुले पोलियो ग्रस्त होत, कायमची लुळीपांगळी होत किंवा मृत्यूमुखी पडत. आरोग्याच्या पुरेशा सोयींचा अभाव, दुर्गम वस्त्या, रोजगारासाठी स्थलांतर करणारी कुटुंबे, लसीकरणा विषयीचे गैरसमज अशी अनेक गंभीर आव्हाने भारतापुढे होती. शासनाचे आणि जागतिक संघटनांचे पाठबळ, निधीची कमतरता भासू न देण्याची दक

विडंबन - या भवनातील शीत पुराणे

हे विडंबन देताना कोणाकोणाची माफ़ी मागावी कळले नाही.  या भवनातील शीत पुराणे रवाळ, कडवे खूप, पाजू द्या -  आज येथले सूप माजशक्तीची चाबुक गाथा खरा शूर हो नमवील माथा जुने सूप अन् जुने घराणे हवा नवा तो कूप --- स्वामी संकेतानंद नवी दिल्ली,  ३एप्रील , २०१४ 

बलबन का मकबरा

इमेज
 क़ुतुब मीनारपासून थोड्याच अंतरावर महरौली Archaeological Park आहे. तिथे आडवाटेला , काटेरी झुडपांत अनेक भग्नावशेष विखुरलेले दिसतात. आपण त्यातून मार्ग काढत पुढे जावे.एका मकबर्‍याचे भग्नावशेष दिसतील. खचलेल्या भिंती दिसतील. भिंती कसल्या ? दगडमातीचा निव्वळ रचलेला थर ! त्यावर दिलेला मुलामा पार उडालाय. कधीकाळी भिंतींना मुलामा दिलेला होता, त्यावर नक्षीकाम होते ह्याची साक्ष देणारा एक छोटासा तुकडा तेवढा एका भिंतीवर दिसेल. छत कधीचेच उडालेय. या चार भिंतींच्या आत, आकाशाच्या छताखाली , लाल वालुकाश्मात बांधलेली एक कबर दिसेल. कबरीचे काही दगड गायब झाले आहेत, काही मोडकळीस आलेले आहेत. कधीतरी कबरीवर चढवलेली चादर ऊन-वारा-पाउस झेलत विरजलेली, एका फटीत अडकल्याने , नावापुरती का होईना ,कबरीवर दिसेल.               ही कबर घियासुद्दीन ' बलबन 'ची. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेला ग़ुलाम घराण्याचा एक प्रबळ सुलतान. दिल्ली आणि परिसरावर बलबनने वीस वर्षे सत्ता गाजवली. बलबन अतिशय कठोर, न्यायप्रिय('न्यायकर्कश' म्हटलं तरी चालेल.) सुलतान होता. सुलतानाला साष्टांग दंडवत घालायची फ़ारसी 'ज़मीनबोस&#

गज़ल- 'आप'

आप यह जो हंगामा खड़ा करते हैं ठीक है, पर क्यों अक्सर बड़ा करते हैं ? वह बड़े भी बच्चे ही कहलाते हैं बारहा ज़िद पे अपनी अड़ा करते हैं आम संभलके रख टोकरीयों में तू इक सड़ा निकले,सारे सड़ा करते हैं आप को रहना होगा सलीके से अब क्योंकि हंगामा हम भी खड़ा करते हैं आप को वह फुर्ती से गिरा सकते हैं आप को जो फुर्ती से खड़ा करते हैं --- संकेत, ०३ जनवरी, २०१४, नई दिल्ली 

विडंबन - अध्यक्ष

अध्यक्ष एक नाट असतो पदाच्या प्रतिष्ठेची लावलेली वाट असतो बोलत असला तरी ऐकवत नाही आता नसला बोलत तरीही 'बोला' म्हणवत नाही संमेलन संपते पंगती उठतात रिकाम्या मांडवात पत्रावळी साठतात अध्यक्ष मनामनात तसंच ठेवून जातो काही लिव्हरचं लिव्हरलाच कळावं असं जातो देऊन काही अध्यक्ष असतो एक धागा वादाला तोंड फ़ोडणारी पीठावरची जागा संमेलन नसलं तेव्हा त्याचं नसतं भान कोटी केली भाषणात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान रसिक येतात जातात कवी मात्र व्याकुळच त्याची कधीच भागत नाही तहान दिसत नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल की सापडतेच काव्यसंग्रहांची खाण याहून का निराळा असतो अध्यक्ष ? तो पीठावर नाही तर कोणावर करतात टीका पत्रकार दक्ष अध्यक्ष खरचं कोण असतो ? कोट्यांची खाण असतो लिव्हरची जाण असतो अक्कल गहाण असतो पायातली वहाण असतो तुंबलेली घाण असतो अध्यक्ष असतो फक्त मुलींसाठी लाजतही नाही , वाजतही नाही -- स्वामी संकेतानंद , ६ जानेवारी, २०१४  दिल्ली 

गज़ल - ग़ालिब तेरी दिल्ली में

देख ये अराजकता , हाहाकार; ग़ालिब तेरी दिल्ली में देख ले जम्हूरी* नाटक,व्यापार; ग़ालिब तेरी दिल्ली में वक़्त ये ग़दर* का ना हो, पर 'मातम-ए-यक शहर-ए-आर्ज़ू'* है हर गली, सड़क,कूचा,जमनापार; ग़ालिब तेरी दिल्ली में कब खड़ा मसीहा हो, कब किस रामलीला, जंतरमंतर पर कौन बन उठे गाँधी या सरदार ; ग़ालिब तेरी दिल्ली में जो उखाड़ने आए खरपतवार ; खुद अब उसका हिस्सा हैं हर हकीम हो जाता है बीमार;ग़ालिब तेरी दिल्ली में छोड़ कर गया था दिल्ली तू जो कभी के वैसी ही तो है वो सियासतें, खूनी कारोबार ग़ालिब तेरी दिल्ली में --------------------------------------------------------------- *जम्हूरी = जम्हूरियत का;गणतंत्र का *ग़दर = 1857 का ग़दर *मातम-ए-यक शहर-ए-आर्ज़ू* = आरजू(कामना)के शहर (के उजड़ने) का मातम(शोक) ; ( ग़ालिब का एक शेर ,जो 1857 की दिल्ली की तबाही के बाद लिखा गया था।                "अब मैं हूँ और मातम-ए-यक शहर-ए-आरज़ू    तोड़ा जो तूने आईना, तिमसाल दार था  " ) --- स्वामी संकेतानंद , २१ जनवरी, २०१४, नई दिल्ली