पोस्ट्स

2013 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पोएटिक लिबर्टी

ढिंगच्याक ढिंकच्याक पोएटिक लिबर्टी कूल, हॅपनिंग, फ़ूल्टू डर्टी आला आला श्रावण झोपाळ्यामागे रावण अमेरिकेची गार्‍हाणी गणपत वाणी सिग्गी पितांना मॉलमध्ये फ़िरतांना हाथों में हाथ तेरा मेरा साथ हाड हूड कमॉन डूड व्हॉट्स योर प्रॉब्लम ? नेव्हर माइंड डियर इट हॅप्पन्स हियर अहाहा ! ते दृष्य पहा मला पहा फ़ुले वहा जीवन त्यांना कळले हो कळले ते पाजळले हो हो-हल्ला क्यूँ है भाई ? किसकी मर गई माई ? जीयो जी  भर के एक और पराठा मख्खन मार के हू वन दि मॅच ? डन्नो, आय हॅव फ़्लाइट टू कॅच केल्याने होत आहे रे थांबल्याने मौत आहे रे चला चला पुढे चला पुढच्याच्या पुढे चला समझौता करनेका नहीं कुचल डालो,रुकनेका नहीं छोटी बातों की चिंता छोड़ दो भक्तगणों, गहरी साँस अंदर लो डूड, इट्स क्वाएट ऍब्सर्ड बट आय डू केअर अबाऊट दि वर्ल्ड नवे-पुराणे अधिक-उणे साहित्याचा कागद कागदावरचे साहित्य भेळपुरी भेळपुरी !! होता है अक्सर ऐसा चाहिए प्रसिद्धी या फ़िर पैसा सुबह घर से निकला था कोई पर वो उसका घर था ही नहीं व्हॉट मॉडर्निस्ट ? व्हॉट पोस्ट-मॉडर्निस्ट ? दि होल वर्ल्ड इज ब्लडी अपॉर्च्युनिस्

... अच्छा हुआ

अब के अकाल रहा, अच्छा हुआ जीना मुहाल रहा, अच्छा हुआ कुछ ना अवाम कहें, अच्छा नहीं थोड़ा बवाल रहा, अच्छा हुआ कोई जवाब मिले या ना मिले कोई सवाल रहा, अच्छा हुआ सब के जवाब दिए सरकार ने मेरा सवाल रहा, अच्छा हुआ कोई मुराद पुरी करते अभी थोड़ा मलाल रहा, अच्छा हुआ राहत मिलें न मिलें, चर्चा रहा भाषण कमाल रहा, अच्छा हुआ ’अपने नसीब खिले’ , उसने कहा, ’ अब के अकाल रहा, अच्छा हुआ’ --- पुणे, १८ मार्च, २०१३

बोलीले जित्ता ठेवा, मराठीले जित्ता ठेवा

मराठी भासेची खासबात काये जी ? असा तुमाले कोनी विचारलनच तं सांगजाल का इच्या बोल्या ! अजी एखाद्या भासेच्या ४२ बोल्या मंजे तुमाले मज्याक वाट्ते का जी ? असी बोल्याइच्या बारेत अमीर भासा मराठीच आये, हिंदी बी नसे अना बंगाली-तमिल-तेलुगु बी नसे. मंग आप्ल्याले अभिमान पायजे का नाई ? अखिन बोल्याइमंदी बी पोटबोल्या आयेतंच.. आता आमच्या झाड़ीबोलीचाच घ्या ना जी. म्हनावाले गेला तं इनमिन ४ जिल्ल्यात बोलतंत, पर असी अमीरी आये भाऊ का , का सांगू तुमाले. भंडार्‍याची(  मराठीतला पयला ग्रंथ, ’विवेकसिंधु’ मुकुंदराजाने भंडार्‍यातच ’आंभोरा’ गावी संगामावरच्या पहाडीवर बसून लिखला. ) अलग, गोंदियाची अलग ,चंद्रपुराची अलग अन गड़चिरोलीची अलग. पर आये झाड़ीबोलीच. तेच मिठास; जरा सब्द अलग, जरा बोलाचा ढंग अलग आये तं का झाला ? पर काही कम-अकलीच्या मानसाइले वाट्ते का झाड़ीबोली मतलब गावठी लोकायची बोली. मराठीत लमड़ीचे हिंदी घुसाडून बोलतंत. मंग आमाले बी वाटत रायला का हंव भाऊ, हे सिकले-सवरले सयरातले लोकं मन्तेत तं सहीच बात असंल. मंग आमी बी कायले झाड़ी बोल्तो जी ? ते घरी अना दोस्तभाइसंगच बोलावाले वापरतो. पुन्यात गेलो तं आमची अखीनच प

नया मसीहा ना भेजियो

आज सुबह जब ख़बर आई की तिंबक्तू की अहमद बाबा इन्स्टिट्यूट को इस्लामी दहशतग़र्दों ने जला दिया हैं, तो मैं विकल हो उठा । इस संस्था में ३०,००० से अधिक सैकडों वर्ष पुरानी पांडुलिपीयाँ जतन कर रखी थी । और यह सब इस्लामी सुवर्णयुग की एक अनमोल धरोहर थी । क्या नहीं था इन में ? इस्लाम की बातें, कु’अरान की टिपणींयाँ, खगोल,रसायन, गणित की क़िताबे थी ! आक्रमनकारियों द्वारा किताबें जला देना कोई नई बात नहीं, सदियों से यह होता आया हैं । दुसरों की सभ्याता के प्रतिकों को, ज्ञान को नष्ट करनें का सबसे आसान तरिका यहीं होता हैं । भारत में भी हुआ हैं । अपने महान भारत में , जिसे हम ’सहिष्णू’ देश कहते हैं, यहाँ भी कट्टरपंथीयों ने लोकायत(चार्वाक)दर्शन के ग्रंथ नष्ट कर दिए, जो नास्तिकवाद या जड़वाद का दर्शन था । आज चार्वाकदर्शन केवल दुसरे दर्शनों के संदर्भ में मिलता हैं । लेकिन यह सब विरोधी विचारधाराओं को दबा देने के होता था । तिंबक्तू में ऐसा नहीं हुआ । इन्हें जलाया गया क्यूंकि कट्टरपंथीयों ने माना की ये ’ग़ैर-इस्लामी’ है ! अरे भई, जो ज्ञान इस्लामी विद्वानों ने इज़ाद किया था, जो इस्लाम के बारे में था, जिस में शायद

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

हलवा माझे आवडते पक्वान आहे. तसे ते अनेकांचे आहे, पण माझे विशेष आहे. आता विशेष म्हणजे खास आहे. खास ह्या शब्दातच ’खा’ असल्याने हलवा जास्तच खाल्ला जातो. हलवा अनेक प्रकारचा असतो.मला गाजराचा जास्त आवडतो. तसा तो अनेक मोठ्या हिरोंना पण आवडतो. हिरोला त्याची आई खूप आवडत असते. मात्र हिरोची आई हलवा विशेष प्रसंगी बनवते. पण आमची आई कधीही हलवा बनवते, म्हणून मला माझी आई हिरोच्या आईपेक्षा जास्त आवडते. हलव्याचे दागिने बनतात. मला हलव्याचे दागिने आवडतात.आईला मात्र सोन्याचेच दागिने जास्त आवडतात. बाबांसाठी आईच एक दागिना आहे. ताईचे दागिने विचित्र असतात. संस्कृतच्या गुरुजींनी, ’लज्जा हा स्त्रीचा दागिना आहे’ ह्या अर्थाचे सुभाषित शिकवले होते. ’म्हणजे ’लज्जा’ हा तस्लिमा नसरीनचा पण दागिना आहे का गुरुजी?’ हा प्रश्न विचारल्याबद्दल मला बाकावर का उभे केले गेले ह्याचे उत्तर मात्र गुरुजींनी दिले नाही.मात्र तरीही मला गुरुजी आवडतात कारण संस्कृतमध्ये खूप मार्क मिळतात. मात्र गुरुजींना गणिताच्या अवचट बाई आवडतात.गणित मला नाही आवडत कारण बाई नेहमी ’समजा तुमच्याकडे १०० रुपये आहेत, दहा सफरचंदे आहेत’, असे म्हणत असते, पण प्रत्य